Search This Blog

Friday, June 10, 2011

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

...आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

Sunday, June 5, 2011

आजही आठवतो...पहिला पाऊस...

तो पहिला पाऊस...
.
.
खूप काही सांगून जातो,
मातीचा ओलावा, आठवणीना जागवतो...
उल्हासित करीतो वातावरणास या
ओठांवरी हास्य खिलवूनी तो बरसतो...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
पावसाच्या त्या सरीत
लखलखत्या विजेसारखे हास्य तुझे
ओठी दवबिंदू पावसाचे
एकटक पाहणारे नयन माझे...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध मातीचा दरवळणारा
पावसात रूप तुझे खिलवणारा
शोधती नजर तुजवर खिळवणारा
मनास या वेड लावणारा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
हट्ट तुझा पावसात भिजायचा
नकार माझा तुला सतवायचा
क्षणात विचार बदलूनी मी अन
हास्य तुझे पाहुनी..पाउस ही बरसायचा...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
बेधुंद होऊनी तू भिजायची
चिंब भिजुनी...मिठीत यायची
आपल्याच विश्वात तू रमायची
प्रेमाची ती सर हर्षाने बरसायची...

आजही आठवतो...पहिला पाऊस
.
.
सुगंध ही मातीचा तसाच आहे
गोडवा पावसाचा ही तोच आहे
चिंब भिजुनी मिठीत येणारी तू
आज मिठीत...तुलाच मी शोधत आहे...तुलाच मी शोधत आहे..

Friday, June 3, 2011

गर्व आहे मी मराठी असल्याचा !!!!

आजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
'मराठा' शिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला.

!!जय भवानी!!
!!जय शिवाजी!!
!!जय महाराष्ट्र!!